31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeव्हिडीओदेवेंद्र फडणवीस, तुमच्या भाजपला थोडी जरी शरम असेल तर एकनाथ शिंदेंना लवकर...

देवेंद्र फडणवीस, तुमच्या भाजपला थोडी जरी शरम असेल तर एकनाथ शिंदेंना लवकर हाकला !

देवेनभाऊ, तुमच्या भाजपकडे अन् तुमच्या अनैतिक महायुतीकडे मराठी मतदारांनी नाकं मुरडलीत. तुमच्या पक्ष नेत्यांनी महायुतीचा अश्लिल प्रयोग केला होता. हे अश्लिलपण अगदी गावच्या वेशीवर आणून ठेवलं होतं(Devendra Fadnavis, if your BJP has even a little shame, call Eknath Shinde early!). राजकारणातील हा नागडेपणा गुजराती संस्कृतीचा भाग असू शकतो. असला फाजिलपणा मराठी मातीत चालत नाही, हे मतदारांनी दाखवून दिलयं. त्यामुळं तुमच्या भाजपला जर थोडीफार लाज, शरम असेल तर या नागडेपणाभोवती काहीतरी वस्त्र गुंडाळा. तुमच्या पक्षीय अश्लिलपणाचा मराठी जनतेला वीट आलाय. म्हणूनच मराठी मतदारांनी तुम्हाला धडा शिकवलाय. तुमच्यासाठी मोठा इशाराय. तो इशारा तुम्ही समजून घ्यायला हवा. महत्वाचं म्हणजे, तुमच्या मोदी – शाह या जोडगाळीला सांगा, तुमचं गुजराती गटार महाराष्ट्रात आणू नका. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नका. नवीन गलिच्छ पायंडे महाराष्ट्रात पाडू नका.देवेंद्रभाऊ, तुम्ही स्वतः एक हुशार व उच्चविद्याविभूषित आहात. केंद्रात नरेंद्र मोदींचा उदय होण्यापूर्वी तुम्ही सुसंस्कृत होतात. पण नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नादाला लागून तुम्ही सुद्धा बिघडलात. महाराष्ट्रात तुमची प्रतिमा ही खलनायकी, कारस्थानी, पाठीत वार करणारी, गृहखात्याचा गैरवापर करून लोकांना त्रास देणारी अशीच आहे. राहूल गांधी यांची काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेनं स्विकारंलय. याउलट मोदी – शाह यांची भाजपा, एकनाथ शिंदे यांची कायद्याच्या चौकटीतील शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकांनी झिडकारलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी