31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeव्हिडीओVIDEO: माहिममध्ये भरलीय जत्रा!

VIDEO: माहिममध्ये भरलीय जत्रा!

माहीम दर्गा येथे दरवर्षी होणाऱ्या 10 दिवसांच्या या यात्रेस देशभरातून भाविक येतात.

मुंबई, विविध लोकांची एक वस्ती. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात आणि इथलेच होऊन जातात. मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती विविध धर्माचा आहे विविध जातीचा आहे. आणि अशाच विविध लोकांसाठी मुंबईमध्ये प्रत्येक धर्माचे विविध धार्मिक स्थळे ही आहेत. मग ते मंदिर असो गुरुद्वारा, चर्च, कींवा मग दर्गा आणि मुंबई मधील अशाच प्रसिद्ध धार्मिक स्थळांमधील एक नाव आहे माहीम दर्गा. माहीम येथील हा दर्गा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या दर्ग्यावर सर्व धर्माच्या लोकांची समान श्रद्धा आहे. या दर्ग्यात सूफी संत ‘मखदुम फकीह अली माहिमी’ यांची कबर आहे.

हे सुद्धा वाचा

कोचिंग क्लासच्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोट न सापडल्याने गुढ वाढले

कोरोनानंतर प्रथमच घडला विक्रम; एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांचा मुंबई विमानतळावरुन प्रवास

VIDEO : नितेश राणे यांची खुल्लमखुल्ला धमकी; आमची माणसे निवडून द्या, नाहीतर निधी विसरा !

अनेक लोक मोठ्या श्रद्धेने या दर्ग्यासा भेट देतात. माहीम दर्गा येथे दरवर्षी 10 दिवसांची जत्रा भरते. यामध्ये देशभरातून भाविक येतात. माहीम दर्ग्यावर पोलिसांची अपार श्रद्धा आहे. यामुळेच मुंबई पोलीस या जत्रेत दर्ग्यावर प्रथम चादर चढवतात. यामागे अनेक कारणे ही आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस माहीमच्या बाबांना आपला मदतनीस मानतात. या दर्ग्याच्या देखभालीसाठी पीर मखदूम साहेब चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे, ज्याचे अध्यक्ष मोहम्मद फारुक सुलेमान दरवेश आहेत आणि मोहम्मद सुहेल याकूब खंडवानी हे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. हा ट्रस्ट शिक्षण, वैद्यक आदी क्षेत्रात कार्यरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी