33 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरव्हिडीओVIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

VIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

सोशल मिडियावर व्हायरल होतोय चक्क इंग्लिश मंगलाष्टके गाणाऱ्या भडजीबुआंचा व्हिडीओ.

लग्न हा शब्द कानावर पडताचं डोळ्यासमोर येते ते म्हणजे नवरा, नवरी, वराती, आणि मंगलाष्टके. महाराष्ट्रीयन लग्नांमध्येतर मंगलाष्टकांना सर्वात महत्वाचे स्थान आहे. मंगलाष्टकांन शिवाय महाराष्ट्रीयन लग्न हे अपुर्णचं मानले जातात. मंगलाष्टके गायल्या शिवाय लग्नाला धार्मिक मान्यता मिळत नाही असे म्हटले जाते. यावरूनच हिंदू लग्नामध्ये मंगलाष्टकांचं काय महत्व असतं हे आपल्या लक्षात येते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या काही राज्यांमध्ये लग्नात मंगलाष्टके गाण्याची पद्धत आहे. एखाद्या लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणत असल्यास त्या मराठीमध्ये कींवा जास्तीत जास्त संस्कृतमध्ये म्हंटल्या जातात. पण सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत भडजीबुआ चक्क इंग्लिशमध्ये मंगलाष्टके गाताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

Video : भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना लावले पळवून

ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वरून सरकारचा निषेध

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजीद मेनन तृणमूल काँग्रेसमध्ये

इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे,या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांडवात नवरा-नवरी उभे आहेत. लग्नाची विधी चालु आहे आणि इतर वराती मंडळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. तेवढ्यातचं एक भडजीबुआ इंग्लिशमध्ये मंगलाष्टके गायला सुरवात करतात. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतीसाद मिळत असून व्हिडीओवर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया ही दिल्या आहेत.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!