36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeव्हिडीओVIDEO : अजित पवारांची मागणी, आरोग्य विभागातील भरती नव्या सरकारने करावी

VIDEO : अजित पवारांची मागणी, आरोग्य विभागातील भरती नव्या सरकारने करावी

शिक्षक भरती अर्थात टीईटी प्रकरणांत शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चांगलेच तापलेले आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पण २०१९ मध्ये पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी घोटाळ्याप्रमाणेच आरोग्य विभागातील पेपर फुटीची देखील माहिती उघड करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी सर्व प्रथम आरोग्य विभागात झालेल्या पेपर फुटीची माहिती उघड केली होती. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा पेपर फुटी झाल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी मान्य केले.

पेपर फुटल्यामुळे भरती रद्द करावी लागली होती, असेही अजित पवार यांनी सांगितले. परिणामी आता नव्या सरकारने आरोग्य विभागातील भरती करावी, असे सुद्धा अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शिक्षक भरतीचा टीईटी घोटाळा हा महाविकास आघाडी सरकार असताना सर्वाधिक गाजला. त्यामुळे आता या घोटाळ्याचा तपास हा ईडीकडून करण्यात येणार असल्याचीच शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही बड्या अधिकाऱ्यांना देखील अटक केले होते. पुणे पोलिसांकडून राज्यात घेतल्या गेलेल्या आरोग्य भरतीच्या पेपर फुटीचा तपास करण्यात येत होता. त्याचवेळी पोलिसांना म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्याचे समजले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी