25 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरव्हिडीओVIDEO: अजित पवारांनी राज ठाकरेंना करुन दिली 'त्या' मुलाखतीची आठवण!

VIDEO: अजित पवारांनी राज ठाकरेंना करुन दिली ‘त्या’ मुलाखतीची आठवण!

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार म्हणाले,"राज ठाकरे यांनी केलेले आरोप धादांत बिनबुडाचे आहेत.

VIDEO: अजित पवारांनी राज ठाकरेंना करुन दिली ‘त्या’ मुलाखतीची आठवण!

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले,”राज ठाकरे यांनी केलेले आरोप धादांत बिनबुडाचे आहेत. त्याला काही अर्थ नाही. आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव घेतले की ती बातमी होते त्यामुळंचं अशा प्रकारचे वक्तव्य केलं जातं”. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही असे खडेबोल ही अजित पवारांनी राज ठाकरेंना सुणावले. राज ठाकरे ज्यावेळेस पवारसाहेबांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी माणसाने वागू नये असे अजित पवार म्हणाले. पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्षे ओळखतो आहे. ५५ वर्षे ते राजकारण करत आहेत. पवार साहेबांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नेहमी डोळ्यासमोर ठेवले. तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. वास्तविक राज ठाकरे यांनी हा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे आणि त्यात नखभर देखील तथ्य नाही, असे ही अजित पवार म्हणाले.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!