32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरव्हिडीओVIDEO : अजित पवारांकडून घेण्यात आली केंद्रीय यंत्रणांची बाजू

VIDEO : अजित पवारांकडून घेण्यात आली केंद्रीय यंत्रणांची बाजू

राज्यात टीईटी अर्थात शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील मोठे नेते अब्दुल सत्तार यांची नावे समोर आली आहेत. या शिक्षक भरतीची परीक्षा पास करण्यासाठी अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी एजंटला पैसे दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तार यांची चौकशी करण्याचे मागणी केली आहे. सदर प्रकरणात अजित पवार यांच्या मुलींची नावे असल्याचे उघड झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. आता नव्या मंत्री मंडळात अब्दुल सत्तार हेच शिक्षणमंत्री असे टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता, सदर प्रकरणाबाबत पावसाळी अधिवेशनात बोलेल असे त्यांनी सांगितले.

पण टीईटी घोटाळा प्रकरण ईडी कडे चौकशीसाठी देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, याबाबत अजित पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची बाजू घेतली. ईडी, एनआयए या संस्था केंद्राच्या अधिपत्याखाली चालतात. पण काहीवेळेस फक्त सीबीआयला राज्य सरकारला विचारल्याशिवाय चौकशी करता येत नाही. असेही यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी