28 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
Homeव्हिडीओAjit Pawar Vs Yugendra Pawar | अजितदादांबरोबर कार्यकर्ते, शरद पवारांसोबत जनता, पारडं...

Ajit Pawar Vs Yugendra Pawar | अजितदादांबरोबर कार्यकर्ते, शरद पवारांसोबत जनता, पारडं पवार साहेबांकडे

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. पण त्यात सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला. सुनेत्राताईंचा झालेला पराभव हे अजित पवार यांचे दारूण अपयश ठरले.

बारामती मतदारसंघाकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणाहून वर्षानुवर्षे आमदार म्हणून निवडून जात आहेत. यापूर्वीच्या निवडणुका अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या छत्रछायेखाली लढविल्या होत्या. परंतु अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हस्तगत केला. त्यामुळे शरद पवारांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली.

आमदारांपेक्षा गावच्या सुपुत्राचा गावाच्या विकासात मोठा वाटा

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. पण त्यात सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला. सुनेत्राताईंचा झालेला पराभव हे अजित पवार यांचे दारूण अपयश ठरले.

पाणी आणण्यामध्ये ३६ आमदारांचे योगदान मोठे | एका आमदाराने श्रेय घेवू नये

आता लवकरच विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लय भारीच्या टीमने बारामती मतदारसंघाचा दौरा केला. शरद पवार व अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत लय भारीचे संपादक तुषार खरात पोहोचले. तेथील लोकांच्या भावना जाणून घेतल्या.

अजित पवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार आमने सामने रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही लढत कशी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना जनतेने नाकारले होते. बारामतीत सुद्धा अजित पवार यांचा दारूण पराभव झाला होता. मग विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजितदादांचा पराभव होणार का की ते निवडून येणार याविषयीच्या जनभावना लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी जाणून घेतल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी