28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरव्हिडीओVIDEO : अष्टविनायक दर्शन - पहिला गणपती मोरगावचा 'मोरेश्वर'

VIDEO : अष्टविनायक दर्शन – पहिला गणपती मोरगावचा ‘मोरेश्वर’

'सुखकर्ता' आणि 'दु:खहर्ता' अशी गणपतीची ओळख आहे. 'गणपती' (Ganapati) ला विद्येची देवता म्हणून ओळखले. कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. त्यानंतर कामाला सुरुवात केली जाते. दरवर्षी वर्षांतून दोन वेळा गणेशोत्सव साजरा केला जातो. एक 'भाद्रपद ' महिन्यात आणि दुसरा 'माघ' महिन्यात आता भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. सगळीकडे गणपतींच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात‍ गणपतीची आठ मंदीरे अष्टविनायक (Astavinayak) या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या पैकी पहिले आहे.

‘सुखकर्ता’ आणि ‘दु:खहर्ता’ अशी गणपतीची ओळख आहे. ‘गणपती’ (Ganapati) ला विद्येची देवता म्हणून ओळखले. कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. त्यानंतर कामाला सुरुवात केली जाते. दरवर्षी वर्षांतून दोन वेळा गणेशोत्सव साजरा केला जातो. एक ‘भाद्रपद ‘ महिन्यात आणि दुसरा ‘माघ’ महिन्यात आता भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. सगळीकडे गणपतींच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात‍ गणपतीची आठ मंदीरे अष्टविनायक (Astavinayak) या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या पैकी पहिले आहे.

‘मोरेश्वर’ (Moreswar) गणपती

मोरगावचा मोरेश्वर गणपती पुणे जिल्हयातील बारामती तालुक्यात आहे. मोरेश्वर गणपती हे गणेशाचे ‘आद्यपीठ’ म्हणून ओळखले जाते. या तिर्थक्षेत्राची ‘भूस्वानंद भुवन’ अशी ओळख आहे. महाराष्ट्रातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे एक आद्यपीठ आहे. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरुन या गणेश पीठाची स्थापना झाली. या गणेशाने मोरावर बसून सिंधू कमलासुर दैत्याचा वध केला.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पाच दिवसांत येथे मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी गणपतीला कऱ्हा नदीच्या कुंडात स्नान करुन दर्शन घेतले जाते. भाद्रपद यात्रा ही सर्वांत मोठी यात्रा आहे. कऱ्हा नदीच्या तीरावर मोरगाव वसले आहे. या गावात कोणाच्याही भाद्रपद महिन्यात घरात गणपती बसवले जात नाही. सर्व गावकरी केवळ मयुरेश्वराची आराधना करतात. गणेश चतुर्थीच्या आधी तीन दिवस पहाटे 5 ते दुपारी 12 या वेळेमध्ये मयुरेश्वराला स्वहस्ते जलस्नान घालण्याची भाविकांना व ग्रामस्थांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. उत्सव काळात पहिल्या दिवसापासून विविध कार्याक्रमांचे आयोजन केले जाते. पूर्वीच्या काळी सिंधू नावाच्या असुराने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी गणपतीने मयुरावर आरुढ होऊन मोरगाव येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे या गणपतीला ‘मयुरेश्वर’ हे नाव पडले.

हे ठ‍िकाण पुण्यापासून 64 किलोमीटर वर आहे. पुण्याहून सासवड, जेजुरीमार्गे मोरगाव हे 77 किमी अंतर आहे. पुण्याहून सोलापूर महामार्गाने चौफुलामार्गाने देखील मोरगावला जाता येते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी