31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरव्हिडीओVIDEO : अष्टविनायक दर्शन : चवथा गणपती रांजणगावचा 'महागणपती'

VIDEO : अष्टविनायक दर्शन : चवथा गणपती रांजणगावचा ‘महागणपती’

रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकांपैकी ( Ashtavinayak ) चवथा गणपती आहे. हे महागणपतीचे स्थान स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी हा सर्वाधिक शक्तीमान गपणती आहे. कमळासनावर व‍िराजमान आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स.10 व्या शतकातील आहे. या गणेशाला दहा हात आहेत. प्रसन्न व मनमोहक अशी मूर्ती आहे. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नुतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधला. हे मंदिर भगवान शंकरांनी वसवले असून, त्यांनीच या गणेश मूर्तीची स्थापना केली. त्रिपुरासूर हा राक्षस अत‍िशय उन्मत्त झाला. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरुन भगवान शंकराने या विनायकास प्रसन्न केले. कार्त‍िक शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी त्रिपुरासुराला भगवान शंकरांनी ठार मारले. त्यावेळपासून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. हे ठिकाण पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यात आहेत. पुणे- अहमदनगर राज्य मार्गावर आहे. रांजणगाव पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे. तर शिरुरपासून 17 किमी अंतरावर आहे. येथून पुणे- सोलापूर महार्गावरील चौफुला येथे देखील जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी