28 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरव्हिडीओVIDEO : अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती ओझरचा ' विघ्नेश्वर'

VIDEO : अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती ओझरचा ‘ विघ्नेश्वर’

पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा गणपती. गणपती हे विद्येचे दैवत आहे. तसेच ते भक्तांचे संकट हरण करून त्यांना सुख देते. त्यामुळेच गणपतीला ‘विघ्नेश्वर’ हे नाव आहेत. भक्तांची संकटे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे गणपती बाप्पा सर्वांना वंदनीय आहेत. अशा विघ्न हरण करणाऱ्या गणपतींचे आठ मंदिरे अष्टविनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती म्हणजे ओझरचा ‘विघ्नेश्वर’ होय. हे स्थान कुकडी नदीच्या क‍िनाऱ्यावर वसलेले आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी (Ashtavinayak)  सर्वांत श्रीमंती गणपती आहे. या गपतीची मूर्ती लांब रुंद आहे. गणपतीच्या डोळया माणिक रत्न असून, कपाळावर हिरा आहे. या गणपतीच्या चेहऱ्यावर तेज असून, मुर्ती प्रसन्न चित्त आहे. हा गणपती सर्व विघ्नांचे हरण करतो, म्हणून त्याला ‘विघ्नेश्वर’ गणपती या नावाने ओळखतात. ही मूर्ती स्वयंभू आहे. या मंदिराच्या चारही बाजूंनी तटबंदी असून, मध्यभागी गणपतीचे मंद‍िर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी १७८५ मध्ये या मंद‍िराचा जीणोद्धार केला

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी