30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : अष्टविनायक दर्शन : तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक

VIDEO : अष्टविनायक दर्शन : तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक

'अष्टविनायक' (Ashtavinayak) म्हणजे आठ विनायक म्हणजेच गणपती. गणपतीला विनायक या नावाने देखील ओळखतात. गणपती हा महाराष्ट्रातल्या प्रिय दैवतांपैकी एक आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीची (Ganpati) पूजा केली जाते. गणपती हे व‍िद्येचे दैवत आहे. तो सर्व प्रकारची विघ्नंन दूर करतो. समृद्धी प्रदान करतो. अशा सर्वांच्या आवडत्या बाप्पाची आठ मंद‍िरे ही अष्टविनायक या नावाने ओळखली जातात. या आठही मंद‍िरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून, ती मनाला सुखावणारी आहे. सिद्धटेकचा (Siddhatek) श्री सिद्धिविनायक (Siddhivinayak)  हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. तो उजव्या सोंडेचा आहे. अष्टविनायकांपैकी तो एकमेव गणपती उजव्या सोंडेचा आहे. (Ganesh Ustav 2022)

‘अष्टविनायक’ (Ashtavinayak) म्हणजे आठ विनायक म्हणजेच गणपती. गणपतीला विनायक या नावाने देखील ओळखतात. गणपती हा महाराष्ट्रातल्या प्रिय दैवतांपैकी एक आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीची (Ganpati) पूजा केली जाते. गणपती हे व‍िद्येचे दैवत आहे. तो सर्व प्रकारची विघ्नंन दूर करतो. समृद्धी प्रदान करतो. अशा सर्वांच्या आवडत्या बाप्पाची आठ मंद‍िरे ही अष्टविनायक या नावाने ओळखली जातात. या आठही मंद‍िरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून, ती मनाला सुखावणारी आहे. सिद्धटेकचा (Siddhatek) श्री सिद्धिविनायक (Siddhivinayak)  हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. तो उजव्या सोंडेचा आहे. अष्टविनायकांपैकी तो एकमेव गणपती उजव्या सोंडेचा आहे. (Ganesh Ustav 2022)

हे स्थान भीमा नदीवर वसलेले स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने प्रशस्त आहे. तसेच सभा मंडप देखील प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदीराचा जीर्णोद्धार केला. या मंद‍िरात पितळी मखर असून, त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून, दौंडपासून 19 किमी अंतरावर आहे. तर राश‍िनपासून 23 किमी अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या देखील असतात. आता पूल देखील झाला आहे. हे मंद‍िर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावापासून 48 किमी अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर आहे. हे मंद‍िर उत्तराभ‍िमुख आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी