33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओअष्टविनायक दर्शन : थेऊरचा 'चिंतामणी'

अष्टविनायक दर्शन : थेऊरचा ‘चिंतामणी’

अष्टविनायक (Ashtavinayak) म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही मंदीरे निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या ठिकाणी असून, यातील अनेक मंदीरे नदी किनारी वसलेली आहेत. अष्टविनायक दर्शनांमध्ये पहिला गणपती हा मोरगावचा मयुरेश्वर असून, अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा (Theur's) चिंतामणी (Chintamani) गणेश होय. हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गपणती अशी त्याची ओळख आहे. (Ganesh Ustav 2022)

अष्टविनायक (Ashtavinayak) म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही मंदीरे निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या ठिकाणी असून, यातील अनेक मंदीरे नदी किनारी वसलेली आहेत. अष्टविनायक दर्शनांमध्ये पहिला गणपती हा मोरगावचा मयुरेश्वर असून, अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा (Theur’s) चिंतामणी (Chintamani) गणेश होय. हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गपणती अशी त्याची ओळख आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे डोळयात लाल मणी आण‍ि ह‍िरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती आसन घालून पूर्वाभ‍िमुख बसलेली आहे. हे मंदीर पुर्णपणे लाकडापासून बनवलेले आहेत. कप‍िलमुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते. गणासुर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला. कप‍िल मुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते. कप‍िल मुनींनी त्याचा जेवण दिले. त्यानंतर त्याने चिंतामणी रत्न चोरले. कप‍िलमुनींनी रत्न परत मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली. गणेशाने गणासुराचा वध केला. मुनींना ते रत्न पर मिळवून द‍िले. त्यामुळे कप‍िल मुनींनी ते रत्न गणपतीच्या गळयात घातले. त्यावेळपासून गणपतीला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले. (Ganesh Ustav 2022)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी