सदर व्हिडीओमध्ये ‘लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी सोलापूर जिल्ह्यातील,सांगोला तालुक्यात वसलेल्या खवासपूर ला भेट दिलेली आहे.खवासपूर हे इतिहासात प्रसिद्ध आहे(Aurangzeb became lame here).औरंगजेबची छावणी असलेले हे ठिकाण आहे असे सांगितले जाते आणि तसा उल्लेख ही खुद्द औरंगजेबचा इतिहासकार खाफिखान याने तशी नोंद करून ठेवलेली आहे.त्याच बरोबर खवासखान नावाच्या सरदाराच्या नावावरून रत्नपूर हे नाव बदलून त्याचे खवासपूर करण्यात आले अशी इतिहासात नोंद आहे.
औरंगजेबाची छावणी खवासपूर येथे असताना तेथील मान नदीला पूर आला होता परंतु मराठ्यांनी हल्ला केला की काय असा त्या औरंगजेबाचा संभ्रम झाला आणि जीव मुठीत घेऊन औरंगजेब पळू लागला. पळण्याच्या ओघात त्याच्या पायाला मोठी जखम झाली आणि औरंगजेब हा कायमचा लंगडा झाला.आणि ह्या घटनेची नोंद खुद्द खाफिखान याने करून ठेवलेली आहे.
सदर ठिकाणी औरंगजेबच्या छावणीचे अवशेष आढळतात.त्याच बरोबर औरंगजेबाने त्याच्या राजपुत सरदारांसाठी बांधलेले नंदीचे मंदीरही तेथे आहे.सदर व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी पहायला मिळतील.
औरंगजेब इथंच लंगडा झाला होता
सदर व्हिडीओमध्ये 'लय भारी' चे संपादक तुषार खरात यांनी सोलापूर जिल्ह्यातील,सांगोला तालुक्यात वसलेल्या खवासपूर ला भेट दिलेली आहे.खवासपूर हे इतिहासात प्रसिद्ध आहे(Aurangzeb became lame here).औरंगजेबची छावणी असलेले हे ठिकाण आहे असे सांगितले जाते आणि तसा उल्लेख ही खुद्द औरंगजेबचा इतिहासकार खाफिखान याने तशी नोंद करून ठेवलेली आहे.त्याच बरोबर खवासखान नावाच्या सरदाराच्या नावावरून रत्नपूर हे नाव बदलून त्याचे खवासपूर करण्यात आले अशी इतिहासात नोंद आहे.