27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं पुण्यात निधन

VIDEO : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं पुण्यात निधन

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी पुण्यात निधन झालं गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर कर्करोगासबंधित उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली .

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी पुण्यात निधन झालं गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर कर्करोगासबंधित उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली . भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. कर्करोगावर उपचार चालू असतानाही व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता त्यांनी मतदान केलं.
मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून विजय मिळवून त्यांनी विधानसभेत विधानसभेत आपली नवीन वाटचाल सुरु केली होती. मात्र याचवेळी त्यांना कर्करोगाची झाला .

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!