34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओVideo : पहिल्याच सामन्यात धोनीला बोल्ड करणारा भारताचा बुम-बुम

Video : पहिल्याच सामन्यात धोनीला बोल्ड करणारा भारताचा बुम-बुम

2015 मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या दरम्यान गुजरात विरुद्ध झारखंड असा सामना खेळवला गेला. प्रेक्षकांचा लाडका धोनी मैदानात फलंदाजीसाठी आला. सगळीकडे फक्त एकच आवाज घुमत होता धोनी-धोनी.... प्रेक्षकांचा उत्साह शिगेला होता. धोनी पहिला बॉल खेळायला उभा राहिला आणि समोरच्या गोलंदाजावर प्रेशर वाढलं. पण एवढ्या प्रेशर सिच्यूएशनमध्ये सुद्धा त्या गोलंदाजाने एक उत्कृष्ट असा यॉर्कर टाकला आणि पहिल्याच चेंडूवर धोनीचा बळी घेतला.

भारतीय संघाचा कॅप्टन कुल अर्थात महेंद्रसिंग धोनी याचे चाहते काही कमी नाहीत. 2016 आणि 2017 साली आयपीएलमधून चेन्नई सुपर किंग्ज संघाला बॅन करण्यात आलं होतं. यावेळी धोनी पुण्याच्या संघाकडून खेळायचा तेव्हा हजारो चेन्नई फॅन ट्रेन भरून पुण्यात सामना बघायला यायचे. 2018 मध्ये जेव्हा चेन्नई पुनरागमन करणार होती त्यावेळी धोनीचा फक्त सराव बघायला स्टेडियमवर लाखो लोक उपस्थित राहत होते. 2015 मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या दरम्यान गुजरात विरुद्ध झारखंड असा सामना खेळवला गेला. प्रेक्षकांचा लाडका धोनी मैदानात फलंदाजीसाठी आला. सगळीकडे फक्त एकच आवाज घुमत होता धोनी-धोनी…. प्रेक्षकांचा उत्साह शिगेला होता. धोनी पहिला बॉल खेळायला उभा राहिला आणि समोरच्या गोलंदाजावर प्रेशर वाढलं. पण एवढ्या प्रेशर सिच्यूएशनमध्ये सुद्धा त्या गोलंदाजाने एक उत्कृष्ट असा यॉर्कर टाकला आणि पहिल्याच चेंडूवर धोनीचा बळी घेतला.

यानंतर संपूर्ण मैदानात शांतता पसरली. बॉलर थेट क्रिझकडे बघत स्तब्ध उभा राहिला. त्याला धोनीच्या विकेटचा आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटतं होतं. सामना संपला दोन्ही संघ आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये परतले. तेवढ्यात गुजरातच्या ड्रेसिंग रूममध्ये एक चिठ्ठी आली. धोनीला त्या गोलंदाजाला भेटायचंय. त्यानंतर संपूर्ण गुजरातचा संघ झारखंडच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. तो नवखा बॉलर मान खाली घालून उभा होता. धोनी बसल्या जागेववरून उठला. हातात एक बॉल घेतला. त्या बॉलवर धोनीने आपली सही केली आणि त्या बॉलरकडे गेला. स्वतःची सही केलेला बॉल धोनीने त्या बॉलरला भेट दिला आणि फक्त एक वाक्य बोलला “वेल बोल्ड..” बॉलरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि या घटनेच्या अवघ्या दोन महिन्यांतच तो बॉलर धोनीच्या नेतृत्वात भातीय संघासाठी खेळू लागला. त्या बॉलरने त्यानंतर अनेक यॉर्कर्स टाकले अनेक विक्रम केले. अनेक विकेट्सही मिळवल्या पण विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात धोनीली टाकलेला यॉर्कर अन् त्याची घेतलेली विकेट बॉलरच्या आयुष्यातील सर्वात महत्त्तवाचा क्षण बनला. त्या बॉलरचं नाव म्हणजे बुम बुम अर्थात जसप्रीत बुमराह.

धोनीने त्याच्या कॅपटन्सी करिअरमध्ये अनेक खेळाडू घडवले त्यातीलच एक खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. जो आज भारताच्या बॉलिंग लाईनअप मधला सर्वात महत्त्वाचा बॉलर ठरला आहे. जर बुमराह त्या दिवशी धोनीला यॉर्कर टाकायला घाबरला असता तर तो आज जगातला सर्वात मोठा गोलंदाज बनूच शकला नसता. अन् धोनीने बुनमराहने मारलेला यॉर्कर मनाला लावला अता तर धोनी जगातला सर्वोत्कॉष्ट कॅप्टन बनला नसता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी