30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरव्हिडीओVIDEO : चंद्रकांत पाटील खुर्चीतून खाली कोसळतात तेव्हा ..

VIDEO : चंद्रकांत पाटील खुर्चीतून खाली कोसळतात तेव्हा ..

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा एक जुना व्हिडीओ सध्या फिरतोय, त्यात चंद्रकांत पाटील हे पत्रकार परिषदेतच खुर्चीतून खाली कोसळतात. आता खुर्चीवाल्याविरोधात कोणते कलम लावणार असा सवाल नेटकरी करत आहेत.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी दोनदा माफी मागूनही त्यांच्या विरोधातला जनतेचा रोष काही कमी होताना दिसत नाही. त्यांचे मीम्स आणि फनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक जुना व्हिडीओ सध्या फिरतोय, त्यात चंद्रकांत पाटील हे पत्रकार परिषदेतच खुर्चीतून खाली कोसळतात. आता खुर्चीवाल्याविरोधात कोणते कलम लावणार असा सवाल नेटकरी करत आहेत.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतानाचा दोन वर्षे जुना सोलापूरमधील हा व्हिडओ आहे. त्यावेळी पत्रकार परिषद सुरू असतानाच खुर्ची तुटल्याने चंद्रकांत पाटील तोल जाऊन पडता-पडता सावरले. त्यांनी टेबल पकडल्याने त्यांना आपला तोल सावरता आला. हा व्हिडीओ शेयर करून आता खुर्चीवाल्यावर 302, 307, 353 यापैकी कुठले कलम लावणार? असा उपहासात्मक प्रश्न नेटकरी करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याबद्दल नको ती कलमे लावून अतिरेक केला गेल्याचा संदर्भ याला आहे. तेव्हा शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांवर यांचे खापर फोडण्यात आले होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली, असे सांगितले गेले होते.

हेही वाचा : 

तोंड काळे झालेले वाचाळ चंद्रकांत पाटील यांची बेताल बडबड; म्हणे, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्रात कार्यकर्ते भीक मागतात!

चंद्रकांत पाटील यांचे विधान अत्यंत दुर्दैवी; रयत शिक्षण संस्थेने केला निषेध

पुण्यात चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे; महापुरुषांच्या अवमानाविरोधात कार्यकर्त्यांनी केली शाईफेक !

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाबद्दल चंद्रकांत पाटील बोलत असतानाच अचानक खुर्ची तुटली होती. मात्र, चंद्रकांत पाटील शाईफेकीनंतर जसे काही झालेच नाही असा आविर्भाव आणत होते, तसेच खुर्चीतून पडताना हसत होते. सुभाष देशमुख हे त्यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासह इतर नेत्यांनीही धाव घेऊन पाटील यांना सावरायला मदत केली होती. “मी टीका करतो, त्यामुळे तिकडून जरा ..” असे त्यावेळी पाटील म्हणाले होते. आता नेटकऱ्यांनी जुना व्हिडीओ शेयर करून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देत बोलती बंद केली आहे.

Chandrakant Patil Fall, Solapur Press Conference, BJP Funny Video

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!