22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeव्हिडीओमुलं इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून मराठी शाळेत जातात

मुलं इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून मराठी शाळेत जातात

सदर व्हिडीओमध्ये लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी निढळ, ता.खटाव, जि. सातारा येथील  जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिलेली आहे(Children leave English medium school and go to Marathi school). सदर शाळेच्या इमारतेची बांधणी उत्कृष्ट दर्जाची असून विद्यार्थ्यांना शक्य तेवढ्या सुविधा देऊन चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक  यांच्याकडून केले जात आहे

सदर व्हिडीओमध्ये लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी निढळ, ता.खटाव, जि. सातारा येथील  जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिलेली आहे(Children leave English medium school and go to Marathi school). सदर शाळेच्या इमारतेची बांधणी उत्कृष्ट दर्जाची असून विद्यार्थ्यांना शक्य तेवढ्या सुविधा देऊन चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक  यांच्याकडून केले जात आहे.प्रत्येक वर्गात एल सी डी लावण्यात आलेले आहेत जेणे करून ग्रामीण भागातील विद्यार्थीही डीजीटल पद्धतीने शिक्षण घेण्याच्या ट्रेन्डमध्ये मागे राहु नयेत.त्याच बरोबर उत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी भाषेचे शिक्षणही विद्यार्थ्यांना सदर शाळेत शिकवले जात आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि शिक्षणाबाबत मुळात एक वेगळी छवी आपल्या मनात ठसवली गेलेली आहे. मुळात एक न्युनगंड आपल्या मनात अनेक वर्षांपासून आहे.शहरातील शाळा त्या शाळांमध्ये दिलं जाणारं शिक्षणाचे गोडवे आपण गात असतो आणि हे गोडवे गात असताना ग्रामीण-शहरी असा भेद निर्माण होतो आणि मग दर्जा ठरवण्यास सुरूवात आपण करत असतो.शहरातील शाळा आणि शिक्षण हे ग्रामीण भागातील शिक्षणापेक्षा दर्जेदार असते असा समज सर्वत्र झालेला आहे. परंतु सदर शाळा आपला हा समज बदलू शकते. सदर शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यावर आमच्या लक्षात आले की जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीही शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षाही किती तरी पट्टीने अधिक हुशार असतात.त्याच बरोबर उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षक आणि सोई विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.अशा ह्या दर्जेदार शाळेची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सदर व्हिडीओमध्ये केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी