28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरव्हिडीओVIDEO : चित्रा वाघ कडाडल्या, संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले

VIDEO : चित्रा वाघ कडाडल्या, संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या या ट्विटमुळे शिंदे-भाजप सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच शिंदे-भाजप सरकारमधील दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीय यांच्यात वाद वाढताना दिसून येत आहे. तर आता भाजपच्या चित्र वाघ विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील नवे मंत्री संजय राठोड असा देखील वाद वाढण्याची शक्यता आहे.

अखेर एक महिन्याच्या कालावधीनंतर शिंदे-भाजप सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुहूर्त सापडला आणि अखेर आज (ता. ९ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता एकनाथ शिंदे गटातील नऊ आणि भाजपच्या नऊ अशा १८ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्री मंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. उलट शिंदे यांच्या गटातील घोटाळेबाज आणि मलीन प्रतिमा असणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची खुर्ची देण्यात आली आहे. या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना स्थान देण्यात आले आहे. म्हणून यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नाराजी दर्शविली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

‘पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे.. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे.. माझा न्याय देवतेवर विश्वास.. लडेंगे….जितेंगे.. @CMOMaharashtra’ असे ट्विट चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या या ट्विटमुळे शिंदे-भाजप सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच शिंदे-भाजप सरकारमधील दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीय यांच्यात वाद वाढताना दिसून येत आहे. तर आता भाजपच्या चित्र वाघ विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील नवे मंत्री संजय राठोड असा देखील वाद वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी