31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : कोविडमुळे म्हातारा होतोय मानवी मेंदू!

VIDEO : कोविडमुळे म्हातारा होतोय मानवी मेंदू!

कोविडमुळे मानवी मेंदू म्हातारा होत आहे. त्यामुळे माणसात लवकर वृद्धत्व येत असल्याचे धक्कादायक तथ्य एका संशोधनातून समोर आले आहे. कोविड-19 अर्थात कोरोनाचे मानवी मेंदूवर इतरही अतिशय गंभीर परिणाम होताना दिसत आहेत.

कोविडमुळे मानवी मेंदू म्हातारा होत आहे. त्यामुळे माणसात लवकर वृद्धत्व येत असल्याचे धक्कादायक तथ्य एका संशोधनातून समोर आले आहे. कोविड-19 अर्थात कोरोनाचे मानवी मेंदूवर इतरही अतिशय गंभीर परिणाम होताना दिसत आहेत.

एका शास्त्रीय अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, असे आढळून आले आहे, की कोविडमुळे मेंदूमध्ये वृद्धत्वासारखीच गुंतागुंतीची समस्या निर्माण होऊ शकते. कोविड 19 विषाणूमुळे श्वसन प्रणालीमध्ये समस्या उद्भवू शकतात, हे यापूर्वीच दिसून आलेले आहे. मात्र, त्यातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांमध्ये आता काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जाणवू लागल्या आहेत. कोविडमधून बचावलेल्या अनेक रुग्णांमध्ये लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि नैराश्य यासारखी लक्षणे जाणवत आहेत.

बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमधील हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. “नेचर एजिंग”मध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित झालेले आहेत. या अभ्यासात, कोविड 19 रूग्णांच्या मेंदूमध्ये गुणसूत्राचा (जीन) वेगळाच वापर होतांना दिसत आहे. मनुष्य वृद्ध होत जाताना मेंदूमध्ये जसे बदल दिसतात तसा या रुग्णात जीनोम वापर होताना दिसू लागला आहे.

या अभ्यासात असे आढळून आले आहे, की कोविड 19 मुळे वृद्धत्वाप्रमाणेच तंतूसंस्थेत बदल प्रतिबिंबित होऊ शकतात. शास्त्रज्ञांनी विशिष्ट मेंदूच्या ऊतींचे नमुने घेतले आणि आरएनए अनुक्रम नावाच्या आण्विक प्रोफाइलिंग तंत्राचा वापर केला. त्यांनी प्रत्येक जनुकाची पातळी मोजली आणि कोविड19 रुग्णांच्या मेंदूतील जनुक अभिव्यक्ती प्रोफाइलमधील बदलांचे मूल्यांकन केले. त्यानंतर त्यांनी त्यांची तुलना संक्रमित व्यक्तींच्या मेंदूमध्ये झालेल्या बदलांशी केली.

हे संशोधन असे सूचित करते, की मेंदूतील जैविक मार्गांमध्ये जे बदल एखाद्या व्यक्तीच्या वयानुसार होतात, तेच बदल गंभीर कोविड19 असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत.

बेथ इस्रायल डेकोनेसचे पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलो असलेले जोनाथन ली म्हणाले, की “कोविडमुळे मरण पावलेल्या रूग्णांच्या मेंदूच्या ऊतींमधील जनुकांची अभिव्यक्ती 71 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असंक्रमित व्यक्तींच्या मेंदू रचनेशी साम्य दाखविणारी आहे. कोविड-19 रूग्णांच्या मेंदूवर वृद्धत्वासारखे परिणाम काय होतात, याचा आणखी अभ्यास केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी