30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरव्हिडीओVIDEO : आक्रमक ध्येयाने पछाडलेल्या बंडखोर तरुणांची दलित पँथर

VIDEO : आक्रमक ध्येयाने पछाडलेल्या बंडखोर तरुणांची दलित पँथर

७० च्या दशकात दलितांवर जे अन्याय होत होते, तत्कालीन रिपब्लिकन पक्षाबाबत देखील नाराजी होती. त्यातूनच दलित पॅँथर ही संघटना उभी राहिली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज वी पवार, अर्जुन डांगळे, भाई संगारे असे नेते या संघटनेतून निर्मान झाले. दलित पॅँथरने व्यापक भूमिका घेऊन डाव्या चळवळींशी देखील जुळवून घेतले.

दलित पॅँथर ही संघटना महाराष्ट्रात १९७२ मध्ये स्थापन झाली होती. दलित पॅँथरचे  (Dalit Panther) हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संघटनेचा सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक असा मोठा परिनाम जनमानसात पडला होता. ७० च्या दशकात दलितांवर जे अन्याय होत होते, तत्कालीन रिपब्लिकन पक्षाबाबत देखील नाराजी होती. त्यातूनच दलित पॅँथर ही संघटना उभी राहिली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वी. पवार, अर्जुन डांगळे, भाई संगारे असे नेते या संघटनेतून निर्मान झाले. दलित पॅँथरने व्यापक भूमिका घेऊन डाव्या चळवळींशी देखील जुळवून घेतले. दलित शब्दाची व्याख्या देखील संघटनेने व्यापक केली होती. राज्यात भटक्या विमुक्तांच्या चळवळी, स्त्रीयांच्या चळवळी अशा अनेक संघटनांवर पुढच्या काळात दलित पॅँथरचा प्रभाव राहिला. त्यामुळे आज महाराष्ट्रातील आंबेडकरी, पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन दलित पॅँथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन केली आणि वर्षभऱ वेगवेगळे उपक्रम राबविले. १९९० नंतरच्या पिढीला दलित पॅँथरचे कार्य काय होते हे समजण्यासाठी हे उपक्रम राबविले. या सुवर्ण महोत्सवाची १० जानेवारीला सांगता होणार आहे. अशी माहिती डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे (Subodh More) यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी