28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरव्हिडीओVIDEO : राजभवनाच्या प्रांगणात मोर थुई थुई नाचला !

VIDEO : राजभवनाच्या प्रांगणात मोर थुई थुई नाचला !

राजभवन राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलाय. असं असलं तरी या राजभवनावर सुखवणारंही काहीतरी घडत असतं. राजभवनवर प्राणी, पक्षी व फुलं यांचाही दरवळ पाहायला मिळत असतो. आपले पंख पसरून नाच करताना मोराचा एक व्हिडीओ समोर आलाय.

राज्यपालांचे निवासस्थान असलेले राजभवन (RajBhavan) हे निर्सगाने नटलेले आहे. मुंबईतील मलबार हिल या श्रीमंतांच्या लोकवस्तीत राजभवनचा मोठा परिसर आहे. समुद्राच्या तिरावर राजभवन आहे. ब्रिटीशकालिन वास्तु, मोकळी हवा, मोठाले वृक्ष, हिरवळ, स्वच्छ व मोकळी हवा असे आल्हाददायक वातावरण राजभवनवर आहे. डोळ्यांना व कानाला भुरळ घालणारे हे वातावरण प्रत्येकाला लुभावत असते.

निसर्गाने नटलेल्या या वातावरणात राजभवनाच्या प्रांगणात विविध पक्षी, छोटेमोठे प्राणी मुशाफिरी करीत असतात. पक्षांचा चिवचिवाट, मोरांचा आवाज कानांना सुखावत असतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात. कशाचीही पर्वा न करता ते उघडपणे भाजपधार्जिणी भूमिका घेतात. त्यामुळं राजभवन राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलाय. असं असलं तरी या राजभवनावर सुखवणारंही काहीतरी घडत असतं. राजभवनवर प्राणी, पक्षी व फुलं यांचाही दरवळ पाहायला मिळत असतो. आपले पंख पसरून नाच करताना मोराचा एक व्हिडीओ समोर आलाय. मोराचा रंगबिरंगी पिसारा पाहताना मन मोहरून जातं. पंधरवड्यापूर्वी सुद्धा खारूताई, पोपट व चिमण्यांचा भांडण करतानाचा, नंतर तडजोड करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. राजकीय कोलाहलात राजभवनवरील मुक्या प्राण्यांचा ही मुशाफिरी पाहण्याच कोणालाही मोह होईल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!