22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeव्हिडीओदेवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis support to land mafia).भेटी दरम्यान अनेक विविध कार्यकर्ते आणि लय भारी च्या चाहत्यांनी संपादकांना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळूच्या चोरी संदर्भात माहिती दिली.सदर विभागाचे आमदार जयकुमार गोरे यांची दादागिरी सुरू असल्याचं ही कार्यकर्त्यांनी सांगितलं

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis support to land mafia).भेटी दरम्यान अनेक विविध कार्यकर्ते आणि लय भारी च्या चाहत्यांनी संपादकांना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळूच्या चोरी संदर्भात माहिती दिली.सदर विभागाचे आमदार जयकुमार गोरे यांची दादागिरी सुरू असल्याचं ही कार्यकर्त्यांनी सांगितलं.या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सदर प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी राजकारण आणि समाजकारणात ३०-४० वर्षांचा अनुभव असणारे जाणते कार्यकर्ते दिलीप तुपे यांच्यासोबत संवाद साधला आहे. वाळू चोरी ही मुळातच गंभीर बाब आहे.त्यातच सरकारने सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे वाळूचे ठेकेही जाहिर केलेले नाहीत.तरीही वाळू चोरी करून मोठ्या प्रमाणात बाहेर विकली जात आहे,असा हा गैर प्रकार सर्रास पणे सुरू असल्याचे दिलीप यांनी सांगितले.सदर विभागाचे लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे(Jaykumar Gore) आणि त्यांचे बगलबच्चु हा प्रकार करत असून गृहमंत्री देव्रेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सदर घटनेची माहिती दिली असता अधिकाऱ्यांची बदली त्यांनी केली अशी खळबळजनकी माहिती दिलीप यांनी आमच्या संपादकांना दिली.अधिकाऱ्यांची इच्छा असूनही तेथील लोकप्रतिनिधी आणि प्रस्थापितांचा त्या अधिकारी वर्ग आणि प्रशासनावर दबाव असल्याचे ही सांगण्यात आले.

शेतातून वाळू पोखरली जाते आणि त्यामुळे ती शेती नापिक होते.शेतकरी वर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.या प्रस्थापितांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जीवानीशी मारण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगण्यात आले.हे सरकार धनदांडग्यांचे आहे अशी सर्वसामान्य आणि गोरगरिबांमध्ये या सरकारबद्दल भावना झालेली आहे आणि त्याल खुद्द सरकार जबाबदार आहे असचं म्हणावं लागेल. शेतकऱ्यांची जमिन कमी किमतीत घेऊन त्याच्या दुपट्ट किमतीत बाहेरच्या लोकांना विकण्याचा सपाटा उघलमुघले नावाच्या तलाठीने सुरू केले आसल्याचेही सांगितले.अधिकारीच भूमाफिया झालेले आहेत ही दुसरी खळबळजणक माहितीही दिलीप तुपे यांनीच लय भारी ला दिली.सदर अधिकारी जणू जयकुमार गोरे यांचा चाकर आहे अशा प्रकारे वागत असल्याचेही सांगण्यात आले.त्याच बरोबर कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची बदली कारायची आणि उघलमुघले सारखे अधिकारी ठेवायचे जेणे करून बेकायदेशीर कामांचा सपाटा सुरू राहील हे त्या कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदली मागचे मुळ कारण असल्याचे सांगण्यात आले.जयकुमार गोरे यांच्या अनेक बेकायदेशीर कामांचा उलगडा  दिलीप तुपे यांनी सदर संवादात केलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी