28 C
Mumbai
Saturday, August 12, 2023
घरव्हिडीओVIDEO : शिवसेनेच्या फुटीला नारायण राणे जबाबदार?

VIDEO : शिवसेनेच्या फुटीला नारायण राणे जबाबदार?

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्यांवर भाष्य करत शिंदे गटाची पाठराखण केली आणि सद्यस्थितीतील भूमिका स्पष्ट केली. यावेळी केसरकर यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी काही गौप्यस्फोट सुद्धा केले. सुशांत सिंह प्रकरणावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, ज्यावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं, त्यावेळी आदित्यजींची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती विशेषतः बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रेस काॅन्फरन्सेस घेतल्या त्याचा मोठा वाटा होता असे म्हणत त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला.

केसरकर पुढे म्हणाले, आमच्यासारखे लोक जी ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करतात ती सुद्धा यामुळे दुखावली गेली होती. दरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांजवळचे संबंध आहे त्यांना मी विचारलं की तुमचा प्लॅटफाॅर्म तुम्ही अशा गोष्टींसाठी तुम्ही कसं वापरू शकता, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आमच्या बहुतांश आमदारांचा अशा तऱ्हेच्या बदनामीला विरोध आहे असे म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बदनामी करण्याचे पितळ यावेळी उघडे पाडले आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी