31 C
Mumbai
Monday, September 5, 2022
घरव्हिडीओVIDEO : रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी काढला चाकू

VIDEO : रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी काढला चाकू

डोळा हा अत्यंत नाजूक अवयव आहे. या अवयवावर शस्त्रक्रियेचे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा उभा राहतो. परंतु शस्त्रक्रिया करून डोळ्यातून चक्क सहा इंची चाकू काढण्याची किमया डॉक्टरांनी (Doctor) केली आहे. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी हे अवघड काम यशस्वी करून दाखविले आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे जनमाणसांमधून अभिनंद व कौतुक करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील ४० वर्षाच्या विलन सोमा भिलावे या रूग्णाच्या डोळ्यातून चाकू काढण्याचे मोठे काम डॉक्टरांनी केले. त्यामुळे या रूग्णाचा जीव वाचला आहे.संबंधित रुग्णाच्या डोळ्यातून धातूची पट्टी काढत असतांना शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह त्यांच्या टीमला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. ती धातूची पट्टी नाही तर चक्क ६ इंचाचा चाकू असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. गुंतागुंतीची ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. मुकर्रम खान आणि त्यांच्या टीमने मोठ्या धैर्याने, आत्मविश्वासानं यशस्वी केली अन संबंधित रुग्णाला जीवदान दिले.रुग्णाला जीवदान देण्याऱ्या डॉक्टरांचे, शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमवर केवळ रुग्णाच्या नातेवाईकांनीच नव्हे तर रुग्णालयातील उपस्थितांनी देखील अभिनंदन, कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सरकारी रुग्णालयात देखील चांगली, तत्पर सेवा मिळते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर देखील रुग्णसेवेसाठी तत्पर असतात, सरकारी रुग्णालयांप्रती विश्वास आजही टिकून आहे. हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी