28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरव्हिडीओVideo : केविलवाणे : वडिलांचा भीषण अपघात, ७ वर्षाच्या मुलाने सुरू केली...

Video : केविलवाणे : वडिलांचा भीषण अपघात, ७ वर्षाच्या मुलाने सुरू केली नोकरी !

दिल्ली येथील एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक सात वर्षीय मुलगा झोमॅटो डिलीवरी करत असल्याचे दिसून येत आहे. वडिलांचा अपघात (Father’s accident) झाला म्हणून घराची जबाबदारी ओळखून एका लहानग्याने बाबाचे फूड डिलीवरी करण्याचे काम स्वतः सुरू केले आहे. दरम्यान फुड डिलीवर करणाऱ्या या मुलाचे नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. सकाळी शाळेत जाऊन संध्याकाळी झोमॅटोची फुड डिलीव्हरी करण्याचे काम हा लहान मुलगा सध्या करीत आहे. हा मुलगा घरोघरी जाऊन फुड डिलीव्हरी करत असल्यामुळे कोणाला त्याचे कौतुक वाटते तर एवढ्या लहान वयात हा मुलगा जबाबदारी सांभाळतो आहे म्हणून वाईट सुद्धा वाटत आहे.

समाजात असे कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतात जिथे आई – वडिलांचा सांभाळ त्यांची काळजी करणे फार दुरापास्त झाल्याचे दिसते परंतु हा चिमुरडा बाबाला अपघातात लागले म्हणून त्यांच्या जागेवर तो स्वतः काम करून घराला सांभाळत आहे, असे हे क्वचितच दिसणारे हे चित्र कौतुकास्पद आहे. इतक्या लहान वयातच जबाबदारीचे भान कळालेला हा लहान मुलगा सगळ्यांसाठीच सध्या प्रेरणादायी ठरत आहे. या चिमुरड्यासाठी झोमॅटो ग्राहकांच्या संवेदना जाग्या झाल्या असल्या तरी त्याची दखल आणखी कोण कोण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!