33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओVIDEO : ग्रामपंचयात निवडणुकांतील अंधश्रद्धा

VIDEO : ग्रामपंचयात निवडणुकांतील अंधश्रद्धा

निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात अनेक प्रकार मतदारांवर दबाव टाकण्यासाठी घडत आहेत. यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अंगारे धुपारे, करणी, नारळावर हात ठेवून मतदाराला विशिष्ठ मतदारालाच मत द्या असे सांगणे, मात्रिकाला बोलावून विशेषत: महिलांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडतात.

काल राज्यात अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात अनेक प्रकार मतदारांवर दबाव टाकण्यासाठी घडत आहेत. यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अंगारे धुपारे, करणी, नारळावर हात ठेवून मतदाराला विशिष्ठ मतदारालाच मत द्या असे सांगणे, मात्रिकाला बोलावून विशेषत: महिलांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडतात. हे सगळे प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक आयोगाच्या लक्षात आणून दिले. तसेच हा निवडणुक आचार संहितेचा भंग आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या विरोधात हे प्रकार घडतात. याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने नागरिकांना कोणत्याही दबावाला बळी पडून मतदान करु नका असे आवाहन केले आहे. अंनिस देखील सर्व मतदारांना आवाहन करते की कोणत्याही दबावाला बळी पडून मतदान करु नका.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी