आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा
आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दोन जण जखमी
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदार संघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दोन जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. माणगंगा नदीमध्ये त्यांची गाडी ५० फुट दरीत कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाल्याचे समजते.या अपघातात जयकुमार गोरे जखमी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशाला गोरे हे उपस्थित होते. नागपूरहून ते आपल्या गावी येत असताना पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यातील फलटणच्या मलठण येथे हा अपघात झाला.
गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात गोरे जखमी झाले असून गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले असून इतर 2 दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
VIDEO : आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदार संघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दोन जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.