शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ता.४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले,जि.सातारा येथे रयत शिक्षण संस्था स्थापन केली(Karmaveer Anna’s ryot was increased by Sharad Pawar).सदर संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. शरद पवार गेल्या ३५ वर्षांपासून सदर संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.याच रयत शिक्षण संस्थेची शाळा न्यु इंग्लिश स्कूल, मेहमानगड जि. सातारा येथे काही दिवसांपूर्वी स्नेह मेळवा पार पडला.सदर शाळेला ५६ वर्ष पूर्ण झालेली आहेत.या मेळाव्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कोणी राज्याचे जीएसटी आयुक्त आहेत तर कोणी उद्योजक अश्या विविध क्षेत्रांमध्ये ह्या शाळेचे विद्यार्थी कार्यरत आहेत. सदर व्हिडीओमध्ये निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी आपणास रयत शिक्षण संस्थेविषयी माहिती देताना दिसत आहेत.चंद्रकांत दळवी हे सध्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमेन या पदावर कार्यरत आहेत.सदर संस्थाच्या शाखा ह्या सर्वप्रथम मंदिरात सुरू झाल्याचे दळवी यांनी सांगितले.या संस्थेसाठी अनेकांनी योगदान दिले असून लोकसहभागावर या संस्थेने आपल्या विविध शाखा उभारल्या आहेत.रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाचे महत्त्व ओळखते आणि गोरगरिब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते.अशी ही संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता योईल त्याच बरोबर या संस्थेचे विविध प्रश्न कसे हाताळता येतील या बद्दल चंद्रकांत दळवी बोलताना दिसत आहेत.
जिथं पिक उगवत नाही, तिथं माणसं उगविली,कर्मवीर अण्णांच्या रयतला शरद पवारांनी वाढवलं
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,हे ओळखून सामान्य जनतेच्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ता.४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले,जि.सातारा येथे रयत शिक्षण संस्था स्थापन केली(Karmaveer Anna's ryot was increased by Sharad Pawar).सदर संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत