27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : खंडाळा घाटात ब्रेक फेल ट्रकचा थरार!

VIDEO : खंडाळा घाटात ब्रेक फेल ट्रकचा थरार!

खंडाळा घाटात एक भयानक घटना घडली. सोलापूरहून कळंबोलीकडे जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक संजय यादव हे सिमेंटच्या गोण्या घेऊन सोलापूरहून कळंबोळीकडे जात होते. खंडाळा घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

खंडाळा घाटात एक भयानक घटना घडली. सोलापूरहून कळंबोलीकडे जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक संजय यादव हे सिमेंटच्या गोण्या घेऊन सोलापूरहून कळंबोळीकडे जात होते. खंडाळा घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संजय यादव यांनी गाडी नियंत्रणात आणून हेड ब्रेकच्या मदतीने घाटात एका बाजूला उभी केली. चालक संजय ट्रक मधून खाली उतरताच तेवढ्यात हेड ब्रेकही निकामा झाला आणि ट्रक आपोआप चालू लागला. ट्रक घाटाच्या उतारावर नियंत्रण न ठेवता वेगाने पळू लागला. ट्रक पुढे जाऊ लागताच चालकाने मागील गड्यांना थांबवले. घाट उतरावरील अमृतांजन पूलावरून भरघाव वेगात आलेला ट्रक बोरघाट पोलिस चौकीसमोर रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला . तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर चालक संजय यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!