28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरव्हिडीओVIDEO : किरीट सोमय्यांचे पुढचे लक्ष्य अस्लम शेख

VIDEO : किरीट सोमय्यांचे पुढचे लक्ष्य अस्लम शेख

राज्यात राजकारणाने वेगळेच वळण घेण्यास सुरूवात केली आहे. सत्ताधारी भाजप विरोधकांच्या मुळाशी उठली असून एकेका विरोधकांच्या घोटाळ्याची यादीच आता बाहेर काढून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करू लागली आहे. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya’s) यांनी विरोधकांचे पितळ उघडे पाडण्याचे मनावरच घेतले आहे. संजय राऊत, अनिल परब यांच्या नंतर सोमय्या यांनी काँग्रेस नेते असलम शेख यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. महाविकास आघाडीत मस्त्य खाते असणाऱ्या शेख यांचा १००० कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा प्रकरण त्यांनी लावून धरले आहे.दरम्यान, पर्यटन खात्याकडून सुद्धा शेख यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यामुळे असलम शेख यांच्यावरील कारवाई अटळ आहे असे सोम्मया यांचे म्हणणे आहे. इतकचं काय त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीच त्यांनी केली आहे.
स्टुडिओ घोटाळा प्रकरणाने डोकं वर काढल्याने शेख यांनी तात्काळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली परंतु या भेटीतून काहीच निष्कर्ष झाला नाही, उलट कारवाईचा धोका शेख यांचे दार जोरजोरात बडवू लागली आहे. या प्रकरणानंतर आणखी कोणाकोणाचा नंबर लागणार आणि शिक्षा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला असून घोटाळ्यातील आरोपी भाजपचा सहारा घेणार का असा प्रश्नच आता उपस्थित होऊ लागला आहे.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!