लय भारी चे संपादक तुषार खरात हे पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागात नुकताच दौरा केला. त्या भागामध्ये जेमतेम दहा-बारा घर आहेत तेथील एका महिलेची भेट झाली. त्यांनी असं सांगितले आम्हाला पंधराशे रुपयांची गरज नाही आम्हाला आमच्या शेतमालाला हक्काचा भाव द्या. सरकारच्या आमच्याकडे काहीच लक्ष नाही.
आमदाराला आम्ही पाहिलंच नाही | लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती
लाडक्या बहिणीचे पैसे आले पण ते कुठे पुरतात त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि तेही त्यांनी मतदानासाठी दिली असतील अशाप्रकारे त्यांनी त्यांचे मत मांडले. तिथे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणारे सत्यजित पाटणकर आणि शंभूराजे देसाई यांच्या बद्दल ही बरीच चर्चा झाली. सरकारने आम्हाला कर्ज दिलं पाहिजे आम्हाला धंदा उभारा उभा करायला हातभार केला पाहिजे असे मत त्या महिलेने मांडले.