25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVideo : लालबागच्या अविघ्न पार्कला पुन्हा लागली आग

Video : लालबागच्या अविघ्न पार्कला पुन्हा लागली आग

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास लालबाग येथे असलेल्या अविघ्न पार्क या गगनचुंबी इमारतीला आग लागली. ही आग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर लागल्याची माहिती समोर आली. या आगीनंतर अग्निशमन दलाला फायर वनचा कॉल देण्यात आला त्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास लालबाग येथे असलेल्या अविघ्न पार्क या गगनचुंबी इमारतीला आग लागली. ही आग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर लागल्याची माहिती समोर आली. या आगीनंतर अग्निशमन दलाला फायर वनचा कॉल देण्यात आला त्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर आलीये. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. सकाळी अकराच्या सुमारास इमारतीच्या 22 व्या मजल्यावर आग लागली. अद्याप आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, याआधी देखील वर्षभरापूर्वी या गगनचुंबी इमारतीला आग लागली होती. तेव्हा सुद्धा शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाकडून आग वीजविण्यात आली होती.

अविघ्न पार्क हि गगनचुंबी इमारत ज्या भागात आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक बैठी घरे आणि चाळी आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही इमारत आहे. परंतु सकाळच्या वेळी आग लागल्याने आणि त्यावेळी या भागात गर्दी असल्याने येथे अग्निशमन दलाला पोहोचण्यास थोडा उशीर झाल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली.

हे सुद्धा पाहा

Video : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी विरोधकांनी राजकारण करू नये

VIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

Video : पुण्यातील मूक मोर्च्याला महिलेचा विरोध

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!