उत्तर कराड येथील म्हासुर्णे गावातील एका नागरिकाने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत आपले मत सांगितले आहे. जो कुणी गुन्हेगार असेल त्याला तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी या गावातील स्थानिक नागरिक नारायण माने यांनी केली आहे. नारायण माने यांनी महाराष्ट्र सरकारच्या कायदा- सुव्यवस्थाबाबत शंका व्यक्त केली आहे.
आमदाराच्या कार्यकर्त्यांची बोलती बंद, काय कामे केली ते सांगता येईना
माने यांचे म्हणणे आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेकडे बरोबर लक्ष दिले नाही. त्यामळे राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. बदलापूर येथे घडलेल्या घटनेत अजून देखील गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली नाही आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले काम बरोबर केले नाही. ते म्हणाले, आम्ही या सरकारला कशासाठी निवडून दिले आहे. आमहाला सरकारचा आधार हवा यासाठी आम्ही तुम्हाला सत्तते बसवतो. मात्र, आमच्या आशा नेहमी अपूर्णच राहत आहे. जो कुणी गुन्हेंगार असेल त्याला शिक्षा हि व्हावीच.
बारामतीत शिक्षण, रोजगाराची काय स्थिती आहे?
आता सरकारने पीक विमा काढला. पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे का? एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातले आहे. आज ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आहे. सरकारने शेकऱ्यांसाठी पीक विमा सुरु केला. मी आतापर्यंत तीन फॉर्म भरले. मात्र, मला आतापर्यंत एक रुपया सुद्धा नाही मिळाला.
आज लहान लहान मुलींवर अत्याचार होतात. मात्र, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्यावर बरोबर लक्ष दिले नहो. त्यामुळे गुन्हेगारांना योग्य वेळेवर शिक्षा होत नाही. तसेहच, जो कुणी गुन्हा करत असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हाच लोकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बाबत भीती निर्माण होईल.