23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeव्हिडीओसत्तेतील नाराज विरोधकांच्या वळचणीला

सत्तेतील नाराज विरोधकांच्या वळचणीला

रविवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला त्या शपथविधीचे नकारात्मक पडसाद विधिमंडळाच्या आवारात पाहायला मिळालं. (Maharashtra cabinet Expansion)

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. विधिमंडळाचा पहिला दिवस वेगळ्याच कारणाने गाजला. कारण रविवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला त्या शपथविधीचे नकारात्मक पडसाद विधिमंडळाच्या आवारात पाहायला मिळालं. (Maharashtra cabinet Expansion)

लाडक्या बहिणींना मार्चपर्यंत पैसे मिळणार नाहीत | महायुतीने बहिणींची केली थट्टा

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले, कारण त्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री असते किंवा त्या पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री असतील त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामध्ये छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, सदाभाऊ खोत, तानाजी सावंत विजय शिवतारे, नरेंद्र भोंडेकर, प्रकाश सुर्वे, रवी राणा यांच्यासारखे अनेक नेत्यांचे नाव आहे. या सर्व नेत्यांनी मंत्रिपद मिळाले नाही, यामुळे जाहीरपणे नाराजी जाहीर केली. (Maharashtra cabinet Expansion)

24 वर्षाच्या तरूणाने आमदाराच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली

छगन भुजबळ नाराज होऊन थेट नाशिकला निघून गेले. यांनतर छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी नाशिक असेल आणि आणखीही शहर असतील त्या ठिकाणी महायुतीचा निषेध केला. छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले गेले पाहिजे अशा पद्धतीचा संताप त्यांनी व्यक्त केलेले आहे. याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांना देखील मंत्रिपद देण्यात आले नाही. सुधीर मुनगंटीवार हे भाजपा पक्षाचे जुने नेते आहे. त्यामुळे त्यांनी देखील या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत नाराजी जाहीर केली. (Maharashtra cabinet Expansion)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी