30 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरव्हिडीओVideo : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी विरोधकांनी राजकारण करू नये

Video : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी विरोधकांनी राजकारण करू नये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात बैठक झाली. सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची एक संयुक्त समिती तयार करुन त्यामध्ये चर्चा करण्यात यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांत कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) प्रकरणी दोन्ही राज्यातील वाद वाढलेला पाहायला मिळाला. या प्रकरणी महाराष्ट्राच्या खासदारांनी संसदेच्या हिवाळी अधवेशनात देखील मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणात मध्यस्ती करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात बैठक झाली. सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची एक संयुक्त समिती तयार करुन त्यामध्ये चर्चा करण्यात यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा वाद रस्त्यावर नाही तर संवैधानिक पद्धतीने हा वाद सोडवला जाऊ शकतो. तसेच दोन्ही राज्यांतील विरोधी पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावा, राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करु नये, असे अमित शहा यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

बुधवारी (ता. 14 डिसेंबर) अमित शहा यांच्यासोबत संसदेच्या इमारतीत जवळपास 25 मिनिटे ही बैठक झाली. यामध्ये अमित शहा यांनी दोन्ही राज्याच्या मंत्र्यांना महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. ज्यामुळे न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही राज्यांनी याप्रकरणी कोणताही वाद न घालण्याचे अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

 

 

हे सुद्धा पाहा

VIDEO: एका लग्नाची नवलाई, काकांनी गायल्या इंग्रजीत मंगलाष्टका

Video : पुण्यातील मूक मोर्च्याला महिलेचा विरोध

Video : भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना लावले पळवून

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!