28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरव्हिडीओVIDEO : काँग्रेसच्या कार्यालयात रंगली 'मंगळागौर'

VIDEO : काँग्रेसच्या कार्यालयात रंगली ‘मंगळागौर’

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून मुंबईत महिला काँग्रेस (Congress) यांच्याकडून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक महिलांनी उत्साहाने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी पारंपारिक वेषभूशा धारण केली होती. नऊवारी साडी नेसून, केसांत गजरे मळून महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. महिलांसाठी यावेळी खास मंगळागौर कार्यक्रमाचे आयौजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद लुटला.

दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना काँग्रेसकडून महिलांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सध्याच्या राजकीय गदारोळातून आणि दैनंदिन जीवनातून महिलांना आनंदाचा क्षण जगता यावा, या उद्देशाने महिलांसाठी या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!