27 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरव्हिडीओVideo : औरंगाबादेतील छेडछाडीच्या घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी

Video : औरंगाबादेतील छेडछाडीच्या घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी

औरंगाबाद येथे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. औरंगाबाद शहरातील सिल्लेखाना चौक या परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याची घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच आता औरंगाबाद येथे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. औरंगाबाद शहरातील सिल्लेखाना चौक या परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेमुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने तिने घाबरून थेट चालत्या रिक्षा मधूनच उडी घेतली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे औरंगाबाद शहरातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेमध्ये अल्पवयीन मुलगी जखमी झालेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिल्लेखाना चौक या परिसरामध्ये एका रिक्षातून पडून अल्पवयीन मुलगी जखमी झाल्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले. याबाबतची अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीला रिक्षात एकते पाहून रिक्षा चालकाने रिक्षा सुरू होताच त्या मुलीशी अश्लील भाषेत संभाषण करण्यास सुरुवात केली. पण यावेळी घाबरलेल्या मुलीने थेट चालत्या रिक्षा मधून उडी घेतली. यामध्ये अल्पवयीन मुलीच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेबाबत तपासणी केली असता, त्यांनी आरोपी रिक्षा चालक अकबर हमीद सय्यद याला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!