नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. (mla ram shinde new chairman of the maharashtra legislative council)
अमित शाहांकडून डॉ.आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख,उद्धव ठाकरे संतापले
विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शंकर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. निलम गोऱ्हे यांनी प्राध्यापक राम शिंदे यांनी सभापतीचे आसन स्विकारावे अशी विनंती केली. (mla ram shinde new chairman of the maharashtra legislative council)
फडणविसांनी वंजारी समाजाचे दोन मंत्री केले, धनगरांना फेकून दिले
“त्यांना पुढच्या बाजून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे त्यांना मागच्या दाराने आणावं लागणार आहे. त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करणार नाही. शंभुराजे देसाई यांची इच्छा होती की त्यांना थेट पुढून आणावं. मात्र त्यासाठी आसन कापावं लागलं असतं. ते बरोबर झालं नसतं, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. (mla ram shinde new chairman of the maharashtra legislative council)