27 C
Mumbai
Tuesday, December 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक

VIDEO : संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक

खासदार सुप्रिया सुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून आल्या. दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे, असेही त्या यावेळी सुळे संसदेत म्हणाल्या. यानंतर खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, राजन विचारे, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी संसदेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून वाद चिघळलेला असतानाचा संसदेत देखील याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील खासदारांना संसदेत हा मुद्दा मांडण्याचे आवाहन मंगळवारी (ता. ६ डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून आल्या. दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे, असेही त्या यावेळी सुळे संसदेत म्हणाल्या. यानंतर खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, राजन विचारे, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी संसदेच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कर्नाटक राज्यात असलेल्या बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर संसदेच्या आवारात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हातात फलक घेऊन खासदार अरविंद स्वतः आणि विनायक राऊत यांनी कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केली.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून चिथावणीखोर वक्तव्य केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे मंगळवारी कर्नाटक राज्याच्या सीमेवर कन्नडी लोकांनी महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केली तसेच मराठी भाषिक लोकांवर हल्ला देखील केला. त्यानंतर राज्यातील वातावरण अधिकच चिघळले आहे. तर या मुद्द्यावरून शिंदे-भाजप सरकारवर टीका करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी