नरेंद्र मोदी व अमित शाह या जोडगोळीचा माजुरडेपणा भारतीय नागरिकांनी उतरवला आहे. हा देश म्हणजे आमच्या बापाच्या मालकीचा आहे. आम्ही वाट्टेल तसा तो चालवू. आम्हाला वाट्टेल त्याला आम्ही देशद्रोही ठरवू(Narendra Modi’s dictatorship may go out of power, India-led democracy may come to power). वाट्टेल त्याच्यावर भ्रष्टाचाराचे लेबल लावू. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा कसाही वापर करून विरोधकांना तुरूंगात डांबू. इलेक्ट्रोल बॉण्डच्या नावाखाली स्वतः भ्रष्टाचार करू, अन् तो लपवून ठेवू. न्याय व्यवस्थेवर मनमानी करू, मीडिया विकत घेवू. भलेही मीडियाला कुणी गोदी मीडिया म्हणून हिणवले तरी चालेल. निवडणूक आयोगाला टाचेखाली आणून शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडण्याची कारस्थाने करू.
विरोधी पक्ष संपवून स्वतःची हुकुमशाही प्रस्थापित करण्याची कारस्थाने करू. संविधान गुंडाळून मनमानीपणे वाट्टेल तसे निर्णय घेवू. आम्ही म्हणेल तोच देशाचा विकास. आम्ही हिंदू – मुस्लिमांमध्ये भांडणे लावून मूलभूत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलीत करू. आम्ही पाकिस्तानच्या विरोधात सतत बोंबलत राहू, पण चीन विरोधात चकार शब्द काढणार नाही. आम्ही गांधी – नेहरू यांना बदनाम करू. पण परदेशी पाहुणे आल्यानंतर गांधींजींच्या समाधीस्थळावर त्यांना घेवून जाऊ. आम्ही नितीन गडकरीसारख्या गुणी मंत्र्यांना जास्तीत जास्त साईड ट्रॅक करू, अन् स्वतःचीच टिमकी वाजत राहू. खोटं बोल पण रेटून बोल हा आमूचा बाणा. आम्ही दोघंच देशाचे कर्ते करविते आहोत. असा हिटलरी थाटाचा दर्प नरेंद्र मोदी व अमित शाह यांना आला होता. हा दर्प देशाला संकटात नेवू लागला होता.
नमस्कार, हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर आमचा हा ‘लय भारी’ यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. फेसबूक पेज व इन्स्टाग्रामला फॉलो व लाईक करा.
तर आपण बोलत आहोत. मोदी – शाह यांच्या हिटलरी वृत्तीविषयी. मोदी – शाह हे दोघेजण गेल्या १० वर्षांत उंडारलेल्या बैलासारखे कसेही उधळत होते. देशाची गाडी संकटात घेवून जात होते. पण या दोघांना आता जनतेनं वेसण घातलीय.