27 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरव्हिडीओVideo : IAS घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचा दणकट उपक्रम

Video : IAS घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचा दणकट उपक्रम

धुळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी त्यांना मिळालेल्या आमदार निधीतून भव्य असे ग्रंथ भवन उभे केले आहे.

अनेक तरुण-तरूणी असे आहेत जे शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघत असतात. पण अनेक विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. अनेकदा विद्यार्थ्यांना तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध होत नसल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण धुळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी त्यांना मिळालेल्या आमदार निधीतून भव्य असे ग्रंथ भवन उभे केले आहे.

धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या काठावर एक भव्य अशी अमेरिकेतील व्हाईट हाऊस सारखी इमारत सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही भव्य इमारत कोणते शासकीय कार्यालय नाही तर अनिल गोटे आमदार असताना त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून हि इमारत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उभी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये विविध पुस्तकांसहित स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ग्रंथ भवनात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अभ्यासिका तयार करण्यात आल्या आहेत, ज्याठिकाणी धुळ्यातील अनेक गावातील विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येत असतात.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!