26.6 C
Mumbai
Thursday, January 26, 2023
घरव्हिडीओVIDEO : जलसंपदाचे नाच रे मोरा नाच !

VIDEO : जलसंपदाचे नाच रे मोरा नाच !

गाण्याच्या तालावर धुंद होऊन नाचणारी खाकी हाफ चड्डी आणि हाफ बाह्यांचा पांढरा शर्ट असा युनिफॉर्म घातलेली ही पोरं कुठल्या शाळेची? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, नाही का? बरं यांनी डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपीही घातलीय.

कुणालाही अगदी नकळत बालपणात घेऊन जाणारं हे गदिमांनी लिहिलेलं आणि पुलंनी संगीत दिलेलं अजरामर बडबड गीत. याच गाण्याच्या तालावर धुंद होऊन नाचणारी खाकी हाफ चड्डी आणि हाफ बाह्यांचा पांढरा शर्ट असा युनिफॉर्म घातलेली ही पोरं कुठल्या शाळेची? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, नाही का? बरं यांनी डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपीही घातलीय. तर ही डंगरी शाळा आहे जलसंपदा विभागाची आणि हे नाचरे मोरही जलसंपदा विभागाचेच आहेत. तुम्हाला गेल्यावर्षी तुफान व्हायरल झालेलं नाच रे मोरा आठवतं का? नवरदेवासमोर मोरासारखा भन्नाट नाचणारा तो तरुण? तो होता पुण्यातला अभीजीत धाले. त्याने या बडबडगीताची परिभाषाच पार बदलून टाकली. लहान मुलांच्या या गाण्यावर इतका भन्नाट डान्स करता येतो, हे त्यानं दाखवून दिलं. तेव्हापासून काय, सगळीकडे नुसता धुरळा! विस्मृतीत गेलेलं हे गाणं आता नागीण आणि पोपटाइतकंच वाजू लागलंय. या नाच रे मोराचं हे नवं जलसंपदा व्हर्जन आहे. जलसंपदा खात्याच्या सातारा विभागाने आयोजित केलेल्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हे गाणं सादर केलं. एरव्ही रुक्ष सरकारी कचेरीत इस्त्री केलेल्या मख्ख चेहऱ्याने बसून राहणाऱ्या अधिकाऱ्यांचं हे नाचरं रूप लोकांना जाम आवडलंय. ही मंडळी तर बालपणात रमलीच, पण तुम्हाला-आम्हालाही शाळेत घेऊन गेली. हो की नाही?

 

हे सुद्धा पहा :  Viral Video : पाकिस्तानी अभिनेत्रीची नेटकऱ्यांनी केली धुलाई

 Viral Audio Clip : किमान तीनशे रुपये तरी द्या, मंत्री भूमरेंच्या सभेआधीच ऑडिओ क्लीप जोरात

Viral News : धक्कादायक! ऑनलाईन साईटवरून मागवला ड्रोन, हाती पडले बटाटे

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!