27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVideo : प्रदीप पटवर्धन एक 'दिलखुलास व्यक्तिमत्व'

Video : प्रदीप पटवर्धन एक ‘दिलखुलास व्यक्तिमत्व’

मराठी मनोरंजन क्षेत्रातील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे (ता. ९ ऑगस्ट) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदीप पटवर्धन यांना रंगभूमीवरील ‘मोरुची मावशी’ या नाटकाने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.मोरुची मावशी या नाटकाने दीड हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग हाऊसफुल्ल ठरले.

प्रदीप पटवर्धन यांच्या आई उषा पटवर्धन या स्वतः रंगभूमीवरील कलाकार असल्याने प्रदीप यांना लहानपणापासूनच अभिनयाची देणगी मिळाली होती.प्रदीप पटवर्धन हे रंगभूमीवर गाजत असतानाच त्यांनी आर्थिक बाजू भक्कम करणारी नोकरी करावी, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. म्हणूनच प्रदीप त्यांना मिळेल ते काम करून पैसे कमवायचे. अशाच वेळी त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेत नोकरी मिळाली. रिझर्व्ह बँक इंडियामध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकाच्या अंतर बँक स्पर्धेत भाग घेतला आणि पुरस्कार सुद्धा पटकावला.हा किस्सा स्वतः प्रदीप पटवर्धन यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता. परंतु नोकरी जाऊन सुद्धा प्रदीप हे नाटकामध्येच काम करत राहिले.

नाटकात काम करत असताना एक दिवस प्रदीप पटवर्धन अभिनेते अमोल पालेकर यांच्या नजरेत आले. यानंतर अभिनेते अमोल पालेकर यांनी प्रदीप यांची विचारपूस केली आणि अमोल पालेकर यांच्या मदतीनेच ते पुन्हा एकदा बँक ऑफ इंडियामध्ये कामावर रुजू झाले. यावेळी मात्र नाटकात काम करण्याने नाराज असलेल्या प्रदीप यांच्या आई उषा पटवर्धन यांनी तू कामासोबत नाटकातही काम कर, असा आत्मविश्वास दिला.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी