27 C
Mumbai
Tuesday, August 22, 2023
घरव्हिडीओप्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर उखडल्या; ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय...

प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर उखडल्या; ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय काळजी करणार?

प्रियांका गांधी यांनी शनिवारी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक महिला कुस्तीपटूंची भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीका केली. मोदी सरकार भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलक महिला कुस्तीपटूंची भेट घेतली. यावेळी प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीका केली. मोदी सरकार भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय काळजी करणार, असा सवालही प्रियंका यांनी उपस्थित केला.

जंतर-मंतरवर धरणे धरलेल्या कुस्तीपटूंची भेट घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मोदी सरकार सिंग यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सिंग यांना आधी त्यांच्या पदावरून हटवा, असेही म्हणाल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना होण्यापूर्वी प्रियांका शनिवारी सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. काही वेळ तिथे बसून त्यांनी महिला कुस्तीपटूंशीही स्वतंत्र संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभा सदस्य दीपेंद्र हुडाही होते.

 

प्रियंका गांधी म्हणाल्या हे खेळाडू आमचा अभिमान आहेत. देशासाठी पदके जिंकण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात, संघर्ष करतात. त्यांचे शोषण, त्यांचा अपमान… हा देशातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, संपूर्ण देशाला खेळाडूंसाठी न्याय हवा आहे.

प्रियांका पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “जेव्हा या मुली देशासाठी पदक जिंकतात, तेव्हा सर्वजण त्यांचे कौतुक करतात, त्यांना देशासाठी अभिमान वाटतात, परंतु आज जेव्हा त्या धरणे धरत बसल्या आहेत, तेव्हा कोणीही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाही. सर्वप्रथम ब्रिजभूषण शरण सिंग यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवावे, कारण या पदावर असताना ते सत्तेचा दुरुपयोग करत राहतील आणि कुस्तीपटूंची कारकीर्द उद्ध्वस्त करतील.”

जंतर-मंतरवर धरणे धरलेल्या कुस्तीपटूंची भेट घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.
जंतर-मंतरवर धरणे धरलेल्या कुस्तीपटूंची भेट घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. (फोटो क्रेडिट : गुगल / झी हिंदुस्थान)

मोदी सरकारवर निशाणा साधत प्रियांका म्हणाल्याकी, हे सरकार सिंह यांना का वाचवत आहे? या मुलींनी आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी खूप काही केले आहे…. पदक जिंकून आल्यावर पंतप्रधानांनी त्यांना बोलावले होते, पण आता ते त्यांची भेट का घेत नाहीत?”

एका प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका म्हणाल्या, की मला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणतीही आशा नाही. महिलांवरील शोषणाचा प्रश्न येतो तेव्हा सरकार गप्प बसते. देशातील तमाम महिलांनी या महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहायला हवे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोन्ही एफआयआरमध्ये काय आहे, हे कोणालाही माहिती नाही. या कुस्तीपटूंना एफआयआर का दाखवला नाही, असा सवाल त्यांनी केला.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली होती. ते म्हणाले होते, की पहिली एफआयआर अल्पवयीन व्यक्तीने केलेल्या आरोपांशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यासह भारतीय दंड संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : 

प्रियंका गांधींनी गाडी थांबवली अन् जखमी अपघातग्रस्त महिलेची स्वत: केली मलमपट्टी

80 अधिक गुन्हे असलेल्या बृजभूषणांवर पोक्सो चा गुन्हा दाखल; तुरूंगात टाकण्याची कुस्तिगिरांची मागणी

बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले; बड्या उद्योगपतीचा हात असल्याचा आरोप

सिंग यांच्यावर लैंगिक छळ आणि धमकीचा आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंनी 23 एप्रिलपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. यापूर्वी त्यांनी जानेवारीत धरणे आंदोलन केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर #कल_भारत_बंद_रहेगा हा ट्रेंड जोरात सुरू आहे.

Priyanka Gandhi slams PM Modi Supports Wrestlers Protest Jantar Mantar WFI Chief Brij Bhushan Singh

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी