27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : पुणे पोलिसांनी रोलरखाली चिरडले जप्त केलेल्या गाड्यांचे सायलेन्सर

VIDEO : पुणे पोलिसांनी रोलरखाली चिरडले जप्त केलेल्या गाड्यांचे सायलेन्सर

पुणे पोलिसांनी ट्विटर अकाऊंटवर एक भन्नाट व्हिडीओ शेयर केला आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकीविरोधात ही अफलातून कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. सायलेन्सरमधून फटाक्यांचे आवाज काढणाऱ्या बुलेटविरोधात ही कारवाई विशेषत: केली गेली. विशेष मोहीम राबवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेट राजांविरुद्ध पुणे पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे.

या विशेष मोहिमेंतर्गत पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात जप्त केलेल्या 195 दुचाकींच्या सायलेन्सरवर एका मैदानात रोडरोलर चालवला. या बुलेट राजांना वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही पोलिसांनी ठोठावला. बुलेटराजांमध्ये पुणे पोलिसांच्या कारवाईने भीतीचे वातावरण सध्या आहे. सर्वसामान्य पुणेकर मात्र डर अच्छा होता है, अशा शब्दांत पुणेकरांचे कौतुक केले आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!