29.9 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरव्हिडीओVIDEO : PWD च्या अधिकाऱ्यांनी रस्ता टाकला गिळून !

VIDEO : PWD च्या अधिकाऱ्यांनी रस्ता टाकला गिळून !

वरळी बीडीडी चाळ येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केल्याचे दाखवून अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने बिले काढली. तब्बल तीन रस्त्यांच्या बाबतीत हा खळबळजनक प्रकार घडला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अर्थात PWD चे अधिकारी बोगस बिले काढण्यात चांगलेच तरबेज आहेत. असे बोगस प्रकार ‘लय भारी’ने नेहमीच चव्हाट्यावर आणले आहेत. आताही नवा बोगस प्रकार ‘लय भारी’च्या हाती लागला आहे. वरळी बीडीडी चाळ येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केल्याचे दाखवून अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने बिले काढली. तब्बल तीन रस्त्यांच्या बाबतीत हा खळबळजनक प्रकार घडला आहे. वरळी येथील शिवसेनेचे नगरसेवक संतोष खरात यांनी हा आरोप केला आहे.

जवळपास दीड कोटी रुपये या रस्त्याच्या डांबरीकरणावर खर्च झाल्याचे दाखवले आहे. स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करून अधिकाऱ्यांनी निधी हडपला असल्याचा आरोप संतोष खरात यांनी केला आहे.

याबाबत पीडब्ल्यूडीच्या वरळी विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आमची टीम थेट पाटील यांच्या कार्यालयात धडकल्यानंतर सुद्धा त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला.

वरळी येथे मोठ्या प्रमाणात बोगस कामे झाली आहेत. माहिती अधिकार कायद्याअन्यवे या कामांचा तपशिल मागितला तरी अधिकारी तपशिल देत नाहीत, असा आरोप संतोष खरात यांनी केला आहे.

हे सुद्धा पहा : Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे ! 

 BDD Chawl Redevelopment : पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या किंमतीची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

PWD : पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी अध‍िकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी