33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : राज ठाकरेंनी सांगितला शस्त्रक्रियेचा अनुभव

VIDEO : राज ठाकरेंनी सांगितला शस्त्रक्रियेचा अनुभव

राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यावर जून महिन्यामध्ये हिप बोन्सची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत हिते. पण आता राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज (ता. २३ ऑगस्ट) त्यांनी रवींद्र नाट्यमंदिर (Ravindra Natyamandir) येथे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. (Shivsena) (MNS) (Viral Video)

राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यावर जून महिन्यामध्ये हिप बोन्सची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत हिते. पण आता राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज (ता. २३ ऑगस्ट) त्यांनी रवींद्र नाट्यमंदिर (Ravindra Natyamandir) येथे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबाबत आपला अनुभव पदाधिकाऱ्यांना सांगितला. त्यांनी सांगितलेल्या किस्स्यांमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. कोरोनामुळे पुन्हा एकदा त्यांचे हाडांचे दुखणे बळावले, अशी माहिती सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आली. हिप बोन्सच्या या शस्त्रक्रियेवेळी त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव आले जे त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले आणि सर्व पदाधिकारी हसून लोटपोट झाले.

राज ठाकरे यांना आधीसुद्धा पायांच्या हाडांचा त्रास झाला होता. पण उपचार करून त्यांचा हा त्रास कमी झाला होता, पण त्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा हाडांच्या त्रासामुळे त्रास होऊ लागले. कोरोना झाल्यामुळे हिप बोन्सचा त्रास होऊ लागला अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मी आता बऱ्यापैकी बरा झालो असून लवकरच राज्यात दौरे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर सुद्धा भाष्य केले. (Shivsena) (MNS) (Viral Video)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी