28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeव्हिडीओVIDEO : आता रिमोट व्होटिंग, निवडणूक आयोगाची घरबसल्या मतदानाची सोय !

VIDEO : आता रिमोट व्होटिंग, निवडणूक आयोगाची घरबसल्या मतदानाची सोय !

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घरबसल्या मतदानाची सोय देण्याबाबत चाचपणी सुरू आहे. (Remote Voting) या रिमोट व्होटिंग पर्यायामुळे मतदारांना कुठूनही मतदान करता येणार आहे. आयोग नववर्षात देशभरातील मतदारांना हे भारी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकेल. 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घरबसल्या मतदानाची सोय देण्याबाबत चाचपणी सुरू आहे. (Remote Voting) या रिमोट व्होटिंग पर्यायामुळे मतदारांना कुठूनही मतदान करता येणार आहे. आयोग नववर्षात देशभरातील मतदारांना हे भारी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकेल.

लोकशाहीने या देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले महत्वाचा अधिकार म्हणजे मतदान. असे असले तरी हा अधिकार अनेकजण जबादारीने वापरताना आढळून येत नाहीत. अनेक कारणास्तव या महत्वपूर्ण अधिकारापासून बहुतांश गट हा या वंचित राहतो ही संख्या कोटींच्या घरात आहे आणि म्हणूनच मतदारांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रिमोट व्होटिंग मशीन आरव्हीएम (RVM)) तयार केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध राज्यांत व शहरांतील मतदारांना ‘आरव्हीएम’द्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणे आता सोपे जाणार आहे.

या नव्या मशीनच्या डेमोकरीता मान्यताप्राप्त 8 राष्ट्रीय पक्ष व 57 प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. हा डेमो 16 जानेवारीला होणार आहे. ही नवी मतदान व्यवस्था जर यशस्वी झाली तर प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाचा हक्क कुठूनही बजावता येणार आहे. मात्र ही रिमोट प्रणाली म्हणजेच ‘आरव्हीएम’ पुढील वर्षी अमलात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मतदानाचा कमी होणारा टक्का वाढावा यासाठी ही ‘रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ बनवली असून त्यामुळे सकारात्मक बदल पाह्यला मिळेल अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता मतदात्याला आता प्रत्यक्षात मतदानासाठी आपल्या मूळगावी अथवा ज्या ठिकाणी यादीत नावा आहे त्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, आपण कुठूनही आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘रिमोट व्होटिंग’ संबंधी एक माहिती पुस्तिका आयोगाने जारी केली. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर 16 तारखेला डेमो झाल्यानंतर ‘आरव्हीएम’ लागू करण्यात येईल, असे अधिकारी म्हणाले. दरम्यान, सर्वप्रथम 72 मतदारसंघांत रिमोट व्होटिंगची सुविधा दिली जाणार आहे. या नव्या ‘आरव्हीएम’ विषयी 31 जानेवारीपर्यंत सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Remote Voting is now possible Vote Now from Anywhere

हे सुद्धा पहा : 

भारतातील पहिल्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे जाणून घ्या फायदे

‘पेगॅसस’ भानगडीमुळे ‘ईव्हीएम’ घोटाळ्याला फुटली वाचा

VIDEO : लोकहो, कोरोनाच्या चर्चेने आजिबात घाबरु नका!

VIDEO : फडणवीसांना नेमकं कोण म्हणाले आय लव्ह यू ?

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी