31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरव्हिडीओAU मुद्यावरून वातावरण पुन्हा तापले

AU मुद्यावरून वातावरण पुन्हा तापले

खासदार शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी यांनी प्रत्युत्तर देत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चित्रपट अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या मुद्यावरून टीका केल्यानंतर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी यांनी खासदार शेवाळे यांचा निषेध टीकेची झोड उठवली आहे.
AU नावाने चित्रपट अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कॉल आले होते. असे सांगत विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने -सामने आल्यानंतर आता रिया चक्रवर्तीचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. खासदार शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी यांनी प्रत्युत्तर देत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये रिया चक्रवर्तीने सांगितले आहे की माझ्या एका मैत्रीनेच्गे नाव अनाया उदास असून, तिचा नंबर AU नावाने माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. त्याचा अर्थ आदित्य उद्धव असा लावला जात असल्याचं रिया चक्रवर्तीने म्हटलं आहे. मात्र आपण कधीही आदित्य ठाकरे यांना भेटलो नसून त्यांचा नंबर देखील माझ्याकडे नाही असेही रिया चक्रवर्तीने सांगितले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!