31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeव्हिडीओसंताजी घोरपडेंचे समाधीस्थळ | निष्ठा अन् गद्दारीचं प्रतिक |

संताजी घोरपडेंचे समाधीस्थळ | निष्ठा अन् गद्दारीचं प्रतिक |

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकविण्यामध्ये संताजी घोरपडे यांचं फार मोठं योगदान आहे. संताजी घोरपडे यांची सातारा जिल्ह्यातील कारखेल (ता. माण) या ठिकाणी समाधी आहे(Samadhi of Santaji Ghorpade). ही समाधी निष्ठा आणि गद्दारीचं प्रतिक आहे. ‘लय भारी’ने टीमन या समाधी स्थळाला, तसेच ज्या ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारले त्या ठिकाणांना भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकविण्यामध्ये संताजी घोरपडे यांचं फार मोठं योगदान आहे. संताजी घोरपडे यांची सातारा जिल्ह्यातील कारखेल (ता. माण) या ठिकाणी समाधी आहे(Samadhi of Santaji Ghorpade). ही समाधी निष्ठा आणि गद्दारीचं प्रतिक आहे. ‘लय भारी’ने टीमन या समाधी स्थळाला, तसेच ज्या ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारले त्या ठिकाणांना भेट दिली. मराठा साम्राज्यातील गद्दार सरदार नागोजी माने याने याच ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारलं होतं. संताजी घोरपडे हे आयुष्यभर स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही गद्दारी केली नाही. उलट नागोजी माने हे कधी मराठ्यांसोबत तर कधी औरंगजेबासोबत राहिले. संताजी घोरपडे हे सकाळच्या वेळी सूर्याला अर्ध्य अर्पण करीत असताना नागोजी माने यांनी विश्वासघाताने संताजी घोरपडे यांच्यावर वार केला. त्यानंतर त्यांचे शीर कापून ते भाल्यावर खोचले, अन् औरंगजेबाच्या दरबारात नेले.
या दोन्ही ठिकाणी ‘लय भारी’ची टीम पोचली. संताजी घोरपडे यांचा जाज्वल्य इतिहास मराठी जनतेला सांगण्याचा प्रयत्न ‘लय भारी’ने केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी